Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर निर्माण समितीचे देणगी क्यूआर कोड फलकाचे उद्घाटन

*श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर निर्माण समितीचे देणगी क्यूआर कोड फलकाचे उद्घाटन

52
0

सोलापूर
श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी ट्रस्ट संस्थेच्या वतीने श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर निर्मितीसाठी देणगीदार व भक्तगणांना ऑनलाइन देणगी देण्यासाठी क्यूआर कोड चे फलक व मंदिराचा नकाशा प्रकाशन सोहळा श्री रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी राजाभाऊ पवार यांच्या हस्ते व कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) आणि श्री दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले
श्री रुपाभवानी मंदिर सोलापूर येथे उद्घाटना पूर्वीचे रूपाभवानी मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मंदिर सभामंडपात क्यू आर कोड चे फलक व नियोजित श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिराचा नकाशा व श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ स्वामी यांच्या प्रतिमा असलेला फलकाचे पूजन करून प्रकाशित करण्यात आले यावेळी विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी गुरुभक्त व देणगीदारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करताना म्हणाले की अक्कलकोट रोडवर होणाऱ्या नियोजित मंदिरासाठी श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी ट्रस्ट या संस्थेचे सामाजिक अध्यात्मिक धार्मिक सार्वजनिक उद्देशाने घेतलेल्या या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करा असे आवाहन केले.
सदर उद्घाटनाप्रसंगी वरील मान्यवरांसह चैतन्य अल्ली , प्रथमेश चौडेकर , अंबादास गुल्लापल्ली , बाबासाहेब गायकवाड , राजेश यलदंडी , नामदेव भैरी , लक्ष्मी दोरनाल , मीनाक्षी भैरी , श्रावणी नराल , राधिका दंडी , माणिक नराल , वसंत गुत्तीकोंडा , लक्ष्मण मेरगु , डॉ. शीतल कुलकर्णी , यांच्यासह श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
*फोटो मॅटर* – श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर नकाशा देणगी क्यूआर कोड चे प्रकाशन सोहळा प्रसंगी राजाभाऊ पवार विष्णू कारमपुरी दत्तगिरी महाराज व भक्तगण दिसत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here