Home उद्योग / शिक्षण वार्ता विकसित भारताचा मार्ग, विकसित शहरातून !- ना उदय सामंत

विकसित भारताचा मार्ग, विकसित शहरातून !- ना उदय सामंत

18
0

विकसित भारताचा मार्ग, विकसित शहरातून !- ना उदय सामंत

विकसित शहरं, सक्षम नगरपालिका आणि नागरिक केंद्रित सुशासनातून घडणार विकसित महाराष्ट्र २०४७! विकास म्हणजे मोठमोठे प्रकल्प, उंच इमारती, रस्त्यांची उभारणी याबरोबरच सामान्य नागरिकांच्या जीवनमानात होणारा सकारात्मक बदल असल्याचं मत आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं आयोजित नगरपालिका, नगरपंचायत, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन आज ना सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ-पाटील, प्रबोधिनीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सूरज आव्हाड उपस्थित होते.
२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, नगरपालिका आणि नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम, पर्यावरणपूरक, आधुनिक आणि नागरिककेंद्रित होणे आवश्यक आहे. या दिशेने स्थानिक उद्योगांना चालना, गुंतवणुकीला पोषक वातावरण, युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी, दर्जेदार पायाभूत सुविधा, डिजिटल सुशासन आणि लोकसहभाग यांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
‘गाव तिथं उद्योजक’या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे हात घडविण्याचा उद्योग विभागाचा संकल्प असून त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
प्रत्येक शहराची स्वतंत्र ओळख, प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाचे उज्ज्वल भविष्य हेच विकसित महाराष्ट्राचे ध्येय आहे असेही ना. सामंत म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here