Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव *माँसाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीतील नागरिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*माँसाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीतील नागरिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

27
0

*माँसाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीतील नागरिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
********************************
*सो.दि. २४/१०/२६ :- दक्षिण सोलापूर कुंभारी येथील माँसाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत नागरी सुविधा पुरविण्याबाबत माँसाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब यांना विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले*
*मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब विडी कामगारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या व विडी कामगारांच्या हिश्यातून मौजे कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर येथील गट क्रं. ५६३ येथे ४८६ घरकुले बांधून सन २००५ साली सभासदांना प्रत्यक्षात ताबा दिले. व गट क्रं. ५८२, ५८३ येथे ३४०. घरकुले बांधून सन २०१०साली सभासदांना प्रत्यक्षात ताबा दिले. व गट क्रं.६७६ येथे ३४३० घरकुलांपैकी ८३० घरकुले बांधून तयार आहेत. सदर ८३० घरकुले आहेत त्याठिकाणी कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने सभासदांना घरकुले वाटप करण्यास अडचणी येत आहेत. अशा प्रकारे गेल्या १२ ते १५ वर्षापासून घरकुलाचा ताबा घेतलेल्या विडी कामगारांना राहण्यास फार त्रास सहन करावे लागत आहे. त्याचबरोबर गट ६७६ मधील ८३० घरकुलांचा ताबा प्रत्यक्षात दिले त्याठिकाणी ही केवळ रस्ता, ड्रेनेज, दिवाबत्ती नसल्याने लाभार्थ्यांना राहणे कठीण झाले आहे*.
*तरी माननीय यांनी आपण सोलापूर जिल्हाधिकारी या नात्याने सदर १६७० विडी घरकुल वसाहतीत नागरिक सुविधा उपलब्ध करून देऊन गरीब महिला विडी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावे असे नमूद करण्यात आले*.
*विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा , गुरुनाथ कोळी , पप्पू शेख रेखा आडकी, लक्ष्मीबाई हिप्पा, लक्ष्मी रच्चा,गीता जक्कन, सविता दासरी,लक्ष्मीबाई कोनापुरे, पद्माबाई म्याकल , यांच्यासह विडी घरकुल वसाहतीचे पदाधिकारी उपस्थित होते*.
*********************************
*फोटो मॅटर :- कुंभारी येथील मासाहेब बिडी कामगार घरकुल वसाहतीत नागरिक सुविधा व मूलभूत गरजा बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना विष्णू कारमपुरी (महाराज) श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here