Home छायाचित्रे / व्हिडिओ *रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद!* *१० ऑगस्टपर्यंत निर्बंध*

*रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद!* *१० ऑगस्टपर्यंत निर्बंध*

36
0

खेड,- पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

तहसीलदार, खेड तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ वरील रघुवीर घाटात अनेक ठिकाणी दरीकडील कडा तुटल्या असून डांबरी रस्ता व साईडपट्टी खचली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर माती व दगड आल्याने रस्त्याला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांतील चारचाकी वाहने व राज्य परिवहन (एसटी) बससेवा वगळता सर्व प्रकारच्या जड व खाजगी वाहनांच्या वाहतुकीस रघुवीर घाट मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच घाट परिसरातील कोणत्याही पर्यटनस्थळी पर्यटकांना थांबण्यास किंवा भेट देण्यासही मनाई करण्यात आली आहे. पावसाळ्यात रघुवीर घाटात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून जीवितहानी होण्याचा धोका लक्षात घेऊन ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिक व पर्यटकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रघुवीर घाट परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन उपविभागीय प्रशासनाने केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here