Home उद्योग / शिक्षण वार्ता कैलास उदमलेंच्या शिक्षण क्षेत्रातील रौप्यमहोत्सवी योगदानाचा गौरव!! तसेच ...

कैलास उदमलेंच्या शिक्षण क्षेत्रातील रौप्यमहोत्सवी योगदानाचा गौरव!! तसेच मराठी भाषा योगदानाचाही सन्मान!

26
0

कैलास उदमलेंच्या शिक्षण क्षेत्रातील रौप्यमहोत्सवी योगदानाचा गौरव!!
तसेच मराठी भाषा योगदानाचाही सन्मान!

कैलास उदमले हे जुहू येथील सेलिब्रिटी नामांकित माणिकजी कूपर या शाळेत मराठी विषय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील सेवेला यावर्षी २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांना शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
वार्षिक कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पर्सिस वाडिया यांनी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील प्रसिद्ध अस्थिरोग शल्य चिकित्सक व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ ऋतुज कामदार कामदार यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पर्सिस वाडिया यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगती विषयी माहिती देऊन कैलास उदमले यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

प्रमुख पाहुणे डॉ डॉ ऋतुज कामदार यांनी त्यांच्या जीवनात शाळेचे व त्यांच्या शिक्षकांचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले.

यानंतर शाळेच्या वरिष्ठ इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सलमा नक्वी यांनी कैलास उदमले यांचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना नक्वी यांनी सांगितले की ” उदमले सर मुक्त पत्रकार आहेत आणि ते एखाद्या विषयावर कसे सखोल विचार करून बोलतात हे सांगितले. त्यांच्या पत्रकारितेचा उपयोग त्यांनी त्यांच्या मराठी भाषेच्या अध्यापनात ही केला व करत आहेत. सरांनी २५ वर्षाच्या कारकिर्दीत शाळेच्या सर्व उपक्रमांना सहकार्य केले त्याचबरोबर आपले ज्ञान व अनुभवाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचे महत्त्वपुर्ण काम केले. त्याचबरोबर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार यासाठी विशेष योगदान दिले.” असे गौरवोद्गार काढले.

त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांची पत्नी डॉ मनिषा उदमले, त्यांच्या दोन्ही कन्या सिद्धी व रिद्धी उदमले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर अनेक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यानंतर बॉलीवूड मधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक डावर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती स्वातंत्र्य लढा व देशाचा विकास यावर आधारित मनोरंजक नृत्याचा कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याध्यापक निमिष वोरा सबीहा अहमद देलशाद दुमासिया निमिषा चतुर्वेदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here