Home उद्योग / शिक्षण वार्ता भारतातील सर्वात मोठ्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कच्या पायाभरणी शुभारंभ*

भारतातील सर्वात मोठ्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कच्या पायाभरणी शुभारंभ*

18
0

*भारतातील सर्वात मोठ्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कच्या पायाभरणी शुभारंभ*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आज नवी मुंबईतल्या महापे इथं पार पडला. या पार्कमध्ये सुमारे ५०००० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. २१.३ एकरमधील या पार्कच्या माध्यमातून नव्यानं सुमारे १ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं महाराष्ट्र हा उद्योगस्नेही असून गुंतवणूकदार, उद्योजकांसाठी नंदनवन आहे, हे पुन्हा एकदा यानिमित्तानं अधोरेखित झाले आहे.
महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांसाठी विश्वासाचे, उद्योजकांसाठी संधीचे आणि उद्योगांसाठी प्रगतीचे केंद्र आहे! .महाराष्ट्राबाहेर उद्योग जात आहेत, अशी खोटी आवई उठविणा-यांना आजचा हा कार्यक्रम सणसणीत चपराक आहे. खोटं बोलून राजकारण करु पाहणा-यांना आजवर आम्ही कामातूनच उत्तर दिलेलं आहे तर जनतेनं मतपेटीतून त्यांना उत्तर दिलंय. असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here