Home छायाचित्रे / व्हिडिओ काश्मीर पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती...

काश्मीर पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून मूक आंदोलन…*

301
0

*काश्मीर पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून मूक आंदोलन…*

 

 

मुंबई दि. २४ एप्रिल – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज हाताला काळ्या फिती लावून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करुन निषेध करण्यात आला.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली हे मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार सुनिल शेळके, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, आमदार पंकज भुजबळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश उपाध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम,प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील, माजी आमदार जयंत जाधव, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here