Home मुख्य बातम्या *दादरचा तोरेस घोटाळा – १.२५ लाख मुंबईकरांचे १००० कोटी लुटले, मुख्य सूत्रधार...

*दादरचा तोरेस घोटाळा – १.२५ लाख मुंबईकरांचे १००० कोटी लुटले, मुख्य सूत्रधार कुठे?* *किरिट सोमय्या कधी बोलणार?*

54
0

*दादरचा तोरेस घोटाळा – १.२५ लाख मुंबईकरांचे १००० कोटी लुटले, मुख्य सूत्रधार कुठे?*
*किरिट सोमय्या कधी बोलणार?*

*MAI MEDIA 24 विशेष | प्रो. शीतल हरीश करदेकर*

*दादर पश्चिम – वास्तू सेंटर. जी नाॅर्थ मनपा कार्यालय गल्ली समोरील
* याच इमारतीत २०२३ ते जानेवारी २०२५ पर्यंत मुंबईच्या इतिहासातील सगळ्यात मोठा दागिन्यांचा घोटाळा घडला.

*काय आहे तोरेस घोटाळा?* प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘तोरेस ज्वेलरी’ नावाने ६ दुकाने काढली – दादर, ठाणे, मिरा रोड, नवी मुंबईत. ३५०-५०० रुपयांचा निकृष्ट मोझानाईट दगड (कृत्रिम हिरा) ८००० रुपयांना विकायचा आणि आठवड्याला ६% परतावा, महिन्याला ३०% परतावा देण्याचे आमिष!

सुरुवातीला पैसे दिले, लोकांनी विश्वास ठेवला. भाजी विक्रेत्यापासून ते निवृत्त कर्मचाऱ्यापर्यंत १ लाख २५ हजार लोकांनी पैसे टाकले. सरकारी आकडा १७७ कोटी सांगतो, पण पोलिसांच्या प्राथमिक तपासात आकडा १००० कोटींच्या वर जाणार आहे. b363

जानेवारी २०२५ मध्ये अचानक दुकाने बंद, हेल्पलाईन बंद, कर्मचारी गायब! दादरमध्ये हजारो गुंतवणूकदार रस्त्यावर उतरले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रांगा लागल्या.

*मुख्य सूत्रधार कोण?* आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) २७,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात आरोपी असे – तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर (CEO) – अटक, ओलेना स्टोईयन, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, व्हिक्टोरिया कोवालेंको, आर्मेन अटायन – हे सगळे युक्रेनियन नागरिक – फरार, देश सोडून पळाले, तझागुल कराक्झानोव्हना झासातोवा (उझबेकिस्तान) आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार (रशियन) – अटक. d00f

*खरा सवाल -* एवढे मोठे नेटवर्क, २५ कोटी रुपये फक्त दुकाने सजवण्यासाठी आणि सुरुवातीला परतावा देण्यासाठी कुठून आले? हे पैसे परदेशात कसे गेले? यामागे मुंबईतला कोण मोठा हात आहे? RBI ची परवानगी नसताना एवढी मोठी पॉन्झी योजना चाललीच कशी?

*किरिट सोमय्या यांनी एकदा लोकांना परत भेटून जावे!* . वर्षाचे ३६५ दिवस दुसऱ्यांना देशाबाहेर हाकलण्याच्या मोहिमा काढणारे, प्रत्येक गोष्टीत तिकीट-तिकीट करून पत्रकार परिषद घेणारे नेते – यांनी दादरमध्ये जाऊन त्या फसलेल्या १.२५ लाख लोकांना एकदा भेटावे! त्या भाजीवाल्याला, त्या निवृत्त आजीला, त्या तरुणाला विचारावे – तुमचे पैसे कुठे गेले?

आज तोरेस कंपनी परत अवतरली आहे! ‘तोरेस इंटरनॅशनल’ नावाने त्याच फसलेल्या लोकांना फोन, मेसेज येत आहेत – “परत पैसे गुंतवा, ३०% परतावा मिळेल, १ लाख लोक जोडले गेले आहेत!” म्हणजे घोटाळेबाज अजूनही मुंबईकरांना लुटायला मोकळे आहेत!

*आमची मागणी स्पष्ट आहे:*
१) तोरेस घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार – दिल्ली-मुंबईतील राजकीय-प्रशासकीय वरदहस्त कोणाचा?
२) युक्रेनला पळालेल्या मास्टरमाईंडना परत आणण्यासाठी लूक आऊट सर्क्युलरचे पुढे काय झाले?
३) EOW ने जप्त केलेले सोने-चांदी-मोझानाईट विकून लोकांचे पैसे कधी परत मिळणार?
४) किरिट सोमय्या यांनी या विषयावर तिकिट थयथयाट करून खरी माहिती समोर आणावी – इमरान खानच्या मागे लागण्यापेक्षा दादरच्या मराठी, हिंदू-मुस्लिम मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहावे!

कायदा आपलं काम करेल, पण लोकांना न्याय मिळायला हवा. हातोडा खरा असेल तर तो गरीबांना लुटणाऱ्या तोरेसवर पडायला हवा, कलाकारांवर नाही!

*- MAI MEDIA 24 | मुंबईकरांच्या पैशाचा हिशोब मागणारच!*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here