*महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यासक हरपला*
*– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
मुंबई दि. २८: ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेला एक चांगला पत्रकार गमावला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा सखोल अभ्यास असलेले आसबे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले. राजकारणाकडे अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व पत्रकारिता क्षेत्रासाठी मार्गदर्शक होते.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.
_उपमुख्यमंत्री कार्यालय (जनसंपर्क कक्ष)_
—
























