Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *२५००/₹ भरलेल्या प्रलंबित म्हाडा महिला विडी कामगारांना भूखंड त्वरित द्या- कामगार सेनेचे...

*२५००/₹ भरलेल्या प्रलंबित म्हाडा महिला विडी कामगारांना भूखंड त्वरित द्या- कामगार सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

45
0

*सोलापूर
” सोलापुरातील २५००/ रुपये भरलेल्या प्रलंबित विडी कामगार महिला सदस्यांना त्वरित भूखंड द्या.” अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मुख्याधिकारी पुणे यांना, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विभाग मंडळ म्हाडा यांना, महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाच्या कार्यालयात देण्यात आले.
मुख्य अधिकारी पुणे म्हाडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात, सोलापुरातील महिला विडी कामगारांसाठी सन १९८४-८५ साली हैद्राबाद रोड येथे ४००० घरांची योजना राबविण्यात आली. त्यावेळी भुखंड शिल्लक नसल्याने ८०० सभासदाना घरकुले मिळू शकले नाहीत. म्हणून सदर महिला विडी कामगारांना भुखंडाची मागणी केली त्यावरुन त्यांना टप्याटप्याने ५८० सभासदांना भखंड वाटप करण्यात आले. उर्वरीत २२० विडी कामगारांना अद्यापही भूखंड मिळाले नाही म्हणून त्यावेळेस लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटना, कामगार प्रतिनिधी, अनेक प्रयत्न केले परंतु २२० सभासदांना भूखंड मिळाले नाही म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सन २०१६ पासून आज पर्यंत गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य म्हाडा चेअरमन, म्हाडा अधिक्षक मुंबई व पुणे विभाग अशा सव स्तरावर प्रयत्न करूनही विभागीय अद्यापही २२० विडी कामगार भुखंड मिळविण्यापासुन वंचित राहिले आहेत.
देशाचे पंतप्रधान व केंद्र सरकार ‘मांगे उसको घर’ या ब्रीद वाक्याप्रमाणे सोलापुरातील विडी कामगार व आर्थिक दुर्बल, घटक व गरीब महिला कुटुंबीयांना सुमारे ५० हजार घरे मिळालीत आहेत. परंतु ज्या महिला बिडी कामगारांनी नियमानुसार सर्व पैसे भरून देखील केवळ भूखंड शिल्लक नाही या कारणास्तव अध्याप भूखंड दिले नाही.
तरी माननीयानी वंचित राहिलेले २२० विडी कामगारांना भूखंड मिळवून देण्याबाबत सहानभूतीचे विचार करावे ही विनंती. अशी मागणी करण्यात आली आहे.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, हमीदाबी शेख, रियाना शेख आदींचा सहभाग होता.
***
*फोटो मॅटर :- सोलापुरातील प्रलंबित म्हाडा घरकुल सदस्यांना महिला बिडी कामगारांना त्वरित भूखंड देण्यात यावे या मागणीचे निवेदन कामगार सेनेच्या वतीने पुणे मुख्य अधिकारी म्हाडा पुणे यांना देण्यात आले.*
*सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज), रेखा आडकी, हमीदाबी शेख, हसीना शेख आदी दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here