Home Uncategorized *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने ज्येष्ठ भाषा संशोधक कै. अरुणा महाळंक यांना...

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने ज्येष्ठ भाषा संशोधक कै. अरुणा महाळंक यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

89
0

पुणे
ज्येष्ठ भाषा संशोधक, शिक्षिका व साहित्य क्षेत्रातील मान्यवर कै. अरुणा महाळंक यांच्या निधनाने साहित्य व शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “कै. अरुणा महाळंक या भारतीय भाषा संस्था येथे भाषाशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापिका म्हणून उल्लेखनीय कार्य केले. तसेच त्या कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने साहित्य व शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी ” कै. अरुणा महाळंक यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या परिवाराला या अतीव दु:खातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी.”अशी प्रार्थना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here