Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद *शेतकऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी अनुदान द्या..! नाहीतर खुर्च्या खाली करा*

*शेतकऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी अनुदान द्या..! नाहीतर खुर्च्या खाली करा*

7
0

*शेतकऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी अनुदान द्या..! नाहीतर खुर्च्या खाली करा*

*बीडमध्ये चटणी-भाकर खाऊन काळी दिवाळी आंदोलन_ अँडहेमाताई पिंपळे*

शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये देऊन त्यांची थट्टा करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना केवळ पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र वादी शरदचंद्रजी पवार पक्षा तर्फे यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांना सन्मानाने सण साजरा करता यावा, यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर अॅड. हेमाताई पिंपळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांची नावे असून, शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here