Home पुणे *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याचे वितरण; सुनेत्रा...

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याचे वितरण; सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे सहभागी*

6
0

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याचे वितरण; सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे सहभागी*

*महाराष्ट्रातील ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता जमा.. !*

पुणे दि. ३० ऑक्टोबर – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ९.३४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८,६९० कोटी रुपयांहून अधिक सन्मान निधी वितरित करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांना सुमारे १,८३५.०१ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत ही मदत बळीराजाला मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

यावेळी कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत विकसित ५२१ युनिट्सचे राष्ट्रार्पण तसेच १२ फलोत्पादन क्लस्टर्सचे उद्घाटनही करण्यात आले. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, आधुनिक कृषी पायाभूत सुविधा आणि फलोत्पादनाला प्रोत्साहन देणारे हे उपक्रम कृषी क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणार आहे असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here