Home मुंबई गणेशोत्सवाला UNESCO चा अमूर्त वारसा दर्जा मिळवण्यासाठी शासन प्रयत्नशील – आ. आशिष...

गणेशोत्सवाला UNESCO चा अमूर्त वारसा दर्जा मिळवण्यासाठी शासन प्रयत्नशील – आ. आशिष शेलार

7
0

गणेशोत्सवाला UNESCO चा अमूर्त वारसा दर्जा मिळवण्यासाठी शासन प्रयत्नशील – आ. आशिष शेलार

*मुंबई, दि. २९ ऑक्टोबर:*

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री *ॲड. आशिष शेलार* यांनी सांगितले.

मुंबईतील बँडस्टँड येथे ‘बाप्पा डॉट ओआरजी’ च्या वतीने आयोजित *’बाप्पाचा कट्टा’* या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.

*काय आहे http://Bappa.org?*
गणेशोत्सवाच्या आठवणी, कथा, छायाचित्रे आणि परंपरा यांचे डिजिटल संकलन करण्यासाठी *www.bappa.org* हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या आठवणी यावर अपलोड कराव्यात, असे आवाहन केले आहे. सहभागींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे ‘कल्चरल प्रिझर्व्हर सर्टिफिकेट’ मिळणार आहे.

*मान्यवरांची उपस्थिती:*
यावेळी अभिनेते *अमेय वाघ*, *निपुण धर्माधिकारी*, http://Bappa.org चे संस्थापक *श्रीपाद अष्टेकर* उपस्थित होते.

*मंत्र्यांचे विधान:*
“गेल्या वर्षी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा झाला. यंदा काश्मीर ते कन्याकुमारी आणि दुबईपर्यंत उत्सव पोहोचला. १२ गड-किल्ल्यांना वारसा दर्जा मिळाल्यानंतर आता गणेशोत्सवाला अमूर्त वारसा दर्जा मिळवणे हे लक्ष्य आहे.” – आशिष शेलार

‘बाप्पाचा कट्टा’ मध्ये उखाणे, ओव्या, म्हणी, पारंपरिक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here