Home राजकीय *बेस्टच्या दिवाळी बोनसवरून राजकीय ट्विस्ट*

*बेस्टच्या दिवाळी बोनसवरून राजकीय ट्विस्ट*

7
0

*बेस्टच्या दिवाळी बोनसवरून राजकीय ट्विस्ट*

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी बेस्टमधील सर्वच कामगार संघटनांनी केली होती. या मागणीवर बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा देखील झाली होती.

नियमानुसार, बेस्टचा दिवाळी बोनस हा बेस्ट समिती अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक यांच्याकडून संयुक्तपणे जाहीर केला जातो.

मात्र, आज भाजप नेते प्रसाद लाड यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापिका सोनिया सेठी यांची भेट घेतली आणि बेस्ट भवनात आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतःच बोनस जाहीर केला.

या प्रकारावर बेस्ट समितीच्या अध्यक्षा कृष्णा विश्वासराव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बेस्ट प्रशासनाकडून बोनसची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

या घटनेमुळे बेस्टमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here