Home Uncategorized *बेस्ट कामगार सेनेतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश*

*बेस्ट कामगार सेनेतील शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश*

56
0

*बेस्टमध्ये उबाठा गटाला खिंडार*

*राष्ट्रीय कर्मचारी सेनेला मिळाले बळ*

मुंबई, ता. २७ सप्टेंबर २०२५

शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बेस्ट कर्मचारी सेनेतील शेकडो कामगार आणि पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार शिवसेना सचिव प्रवक्ते राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष किरण पावसकर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे बेस्ट युनिट अध्यक्ष किसन वाळुंज सरचिटणीस किरण साळुंखे, कोर कमिटी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे चिटणीस सचिन लिमन, बेस्टचे कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या प्रवेशामुळे बेस्ट उपक्रमातील कामगार सेनेत राष्ट्रीय कर्मचारी सेना भक्कम झाली. नुकताच पार पडलेल्या बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे दोन उमेदवार निवडून आले होते.

राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष किरण पावसकर म्हणाले की “बेस्ट कामगार सेना उबाठा गटातील कुलाबा, घाटकोपर, आणि मजास या आगारातील सभासद पदाधिकारी यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत आज प्रवेश केला. बेस्ट कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षापासून भरघोस बोनस देण्याचे काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रीय कर्मचारी सेनेने केले.लवकरच बेस्ट कामगारांचा मेळावा होणार असून त्या मेळाव्यास खासदर डॉ. श्रीकांत शिंदे बेस्ट कामगारांना मार्गदर्शन करतील ,असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here