मुंबई दिनांक 18 जानेवारी 2025
विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख गंभीर आणि अमान्य –अँड.अमोल मातेले
महाराष्ट्र शासनाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोलय मातेले यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.
एडवोकेट अमोल मातेले म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख केल्याने समाजात भेदभाव वाढू शकतो, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात समानता आणि समता राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेतला गेला पाहिजे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावर त्वरित स्पष्टीकरण द्यावे आणि हा निर्णय रद्द करण्याची घोषणा करावी. अन्यथा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करून सरकारला जाग आणेल.”
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नेहमीच सामाजिक समतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे. हा निर्णय केवळ गैरसोयीचा नसून, तो राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक धोरणांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा निर्णय मागे न घेतल्यास, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार करण्यात येत आहे.
टिप: हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलनाची पुढील माहिती लवकरच जाहीर केली जाईल.





















