Home Uncategorized वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दिनांक ३१ जानेवारी पासून तीन...

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दिनांक ३१ जानेवारी पासून तीन दिवस पुष्पोत्सव* *उद्यानविद्या प्रदर्शनात मुंबईकरांना अनुभवता येणार विविधरंगी फुलं आणि फळझाडे*

100
0

*वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दिनांक ३१ जानेवारी पासून तीन दिवस पुष्पोत्सव*

*उद्यानविद्या प्रदर्शनात मुंबईकरांना अनुभवता येणार विविधरंगी फुलं आणि फळझाडे*

सतत धावणाऱ्या मुंबईला आणि कामात व्यस्त असणाऱ्या मुंबईकरांना थोडासा विरंगुळा मिळावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दिनांक ३१ जानेवारी ते दिनांक २ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. यंदाचा हा २८ वा पुष्पोत्सव आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (उद्याने) श्रीमती चंदा जाधव, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

विविध प्रजातीची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगबेरंगी फुलझाडे, औषधी वनस्पती इत्यादी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा या पुष्पोत्सवात समावेश असेल.

आतापर्यंत पार पडलेल्या पुष्पोत्सवांना जपान, मलेशिया, कॅनडा, मॉरिशस या देशांच्या राजदूतांसोबतच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती मंजुषा देशपांडे, अभिनेता श्री. रणजित, श्री. पवन मल्होत्रा, श्रीमती एकता जैना, ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री. दिलीप वेंगसेकर यासारख्या दिग्गजांनी भेट दिली आहे.

फुलझाडे आणि फळझाडांच्या प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तुंची विक्री, झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने याठिकाणीही नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी खुली करण्यात येणार आहेत.

सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here