From the office of
Shri. Uday Samant
Hon Minister , Industries, Investment and Services & Marathi language and Guardian Minister of Ratnagiri District
रत्नागिरीतील क्रीडा विकासाला नवी चालना!
साळवी स्टॉप येथे कबड्डी ग्राऊंडच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न!
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाशेजारील मोकळ्या जागेत कबड्डी ग्राऊंड विकसित करण्याच्या टप्पा १ व २ मधील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज पालकमंत्री व उद्योग मंत्री यांठ्याहस्ते संपन्न झाला.
स्थानिक खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, कबड्डीसारख्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देणे आणि नवोदित खेळाडूंना आपल्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद पक्षप्रतोद बाबूशेठ म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, मुख्याधिकारी वैभव गारवे, स्थानिक नगरसेविका पूजा पवार, नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Facebook : https://www.facebook.com/share/p/1J2BKFH1Tt/
Instagram : https://www.instagram.com/p/DfIMoBpjpBw/?utm_source=ig_web_copy_link&vrfl=MzRlODBiNWFlZA==&srtk=MzRlODBiNWFlZA==
X : https://x.com/samant_uday/status/2116230576671957390?a=vBnMusWij_Paq58op_U&s=20
Youtube : https://www.youtube.com/post/UgkxoDq1CxRkqk6BRq8MsMe8cIKtI1H65ih_

























