Home मुंबई मतदार यादी पुनर्रीक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ

मतदार यादी पुनर्रीक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ

6
0

मतदार यादी पुनर्रीक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ

मुंबई
देशभरातील मतदार यादी पुनर्रीक्षणाचे काम आटोपता आटपेना झाले आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे.महाराष्ट्रात हे काम पूर्ण करण्यासाठी २६ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती, ती वाढवून आता १३ नोव्हेंबर करण्यात आली आहे. प्राप्त झालेले आक्षेप आणि दाव्यांवर सुनावणी घेऊन २५ नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकरणांचा निपटारा केला जाईल. राज्यातील अंतिम आणि सुधारित मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. ज्या नागरिकांनी अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांच्या माहितीत चुका आहेत, त्यांना पुरेसा वेळ मिळावा हा या मुदतवाढीचा मुख्य उद्देश आहे. मतदार आपल्या नावातील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा नवीन नाव नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत व्होटर्स सर्व्हिस पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
नकाशे पहा

दिल्ली, हरयाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि नागालँड या राज्यांमध्ये ही सुधारित तारीख लागू करण्यात आली असून या मोहिमेची अंतिम मुदत पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादी पुनरीक्षणाच्या वेळापत्रकाबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर दोनच दिवसांत हा निर्णय समोर आला आहे. संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगाने वेळापत्रकात हा बदल केला आहे. यामुळे नवीन मतदारांना नोंदणीसाठी आणि नाव किंवा पत्ता दुरुस्तीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

हरयाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि नागालँड या राज्यांमध्ये हरकती आणि दाव्यांचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, तर महाराष्ट्राप्रमाणेच ३० नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
राजधानी दिल्लीमध्ये दावे दाखल करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरवरून वाढवून १३नोव्हेंबर करण्यात आली आहे. दाव्यांची छाननी १५ डिसेंबरपर्यंत चालेल आणि दिल्लीतील अंतिम यादी २२ डिसेंबर रोजी समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here