Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न!* *नाट्यंकुर, विक्रोळीच्या ‘पाकिस्तानचं यान’...

*‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न!* *नाट्यंकुर, विक्रोळीच्या ‘पाकिस्तानचं यान’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट पारितोषिक*

9
0

*‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न!*
*नाट्यंकुर, विक्रोळीच्या ‘पाकिस्तानचं यान’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट पारितोषिक*

रंगभूमीवरील मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धा महोत्सवाची अंतिम फेरी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत नाट्यांकुर, विक्रोळी या संस्थेच्या ‘पाकिस्तानचं यान’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट, रेबन एंटरटेनमेंट, पुणे यांच्या ‘अपूर्णम’ या एकांकिकेला उत्कृष्ट, तर प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर यांच्या ‘बिन रंगाची गोष्ट’ या एकांकिकेला उत्तम पारितोषिक प्राप्त झाले.

शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ हा उपक्रम दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. याच उपक्रमांतर्गत यंदाही ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील दहा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. त्यातून निवड झालेल्या १७ एकांकिकांची अंतिम फेरी २७ व २८ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे पार पडली.

२७ ऑक्टोबर रोजी अंतिम फेरीचे उद्घाटन स्पर्धेचे समन्वयक तथा नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, परीक्षक दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, भारत गणेशपुरे, सुरेश जयराम, शिल्पा तुळसकर तसेच कार्यकारी समितीचे सदस्य शिवाजी शिंदे आणि श्री. विशाल शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते सुनील बर्वे, आशुतोष गोखले आणि अक्षर कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेच्या निमित्ताने अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिकांमधील कलावंतांसाठी त्यांच्या गावी जाऊन विशेष नाट्य कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते कुमार सोहोनी, देवेंद्र पेम, अमेय दक्षिणदास, संतोष पवार, विजय केंकरे, अद्वैत दादरकर, प्राजक्त देशमुख, विजू माने, डॉ. अनिल बांदिवडेकर आणि पंढरीनाथ कांबळे यांनी कलावंतांना मार्गदर्शन केले.
विजय केंकरे, अद्वैत दादरकर, प्राजक्त देशमुख, विजू माने, डॉ. अनिल बांदिवडेकर आणि मा. पंढरीनाथ कांबळे यांनी कलावंतांना मार्गदर्शन केले.

अंतिम फेरीत विविध विषयांवर आधारित आणि नावीन्यपूर्ण मांडणी असलेल्या एकांकिका सादर करण्यात आल्या. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेच्या कार्याची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, कलाकार शोधणे, त्यांना घडवणे आणि त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे नाट्य परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हौशी आणि महाविद्यालयीन कलावंतांसाठी नाट्य परिषदेने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून रसिकांना नवनवीन कलाकृती पाहण्याची संधी मिळणार असून, भविष्यात व्यावसायिक रंगभूमीलाही सक्षम कलावंत मिळतील.

२८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभाला नाट्य परिषदेचे माजी पदाधिकारी गुरुनाथ दळवी, अभिनेते प्रदीप कबरे, अभिनेते शरद पोंक्षे, संजय देसाई, गीता सोमण, सुनील वणजू, जयंत जातेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, भारत गणेशपुरे,
सुरेश जयराम आणि शिल्पा तुळसकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी जबाबदारी सांभाळली. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालनही त्यांनी केले, तर नाट्य परिषदेचे सदस्य शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here