Home राजकीय राष्ट्रीय धोरणांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जेंडर बजेटिंगचा विस्तार आवश्यक : डॉ. नीलम...

राष्ट्रीय धोरणांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जेंडर बजेटिंगचा विस्तार आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे

30
0

राष्ट्रीय धोरणांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जेंडर बजेटिंगचा विस्तार आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे

फरीदाबाद, दि. ८ सप्टेंबर २०२६ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया के. रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली ७ व ८ सप्टेंबर रोजी ताज सूरजकुंड, फरीदाबाद येथे महिला आमदार आणि विधान परिषद सदस्यांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटिंग आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर सादरीकरण केले. गेल्या २५ वर्षांतील अनुभव तसेच महानगरपालिकांमध्ये राबविलेल्या प्रयोगांची माहिती त्यांनी सहभागी महिला लोकप्रतिनिधींना दिली.

केंद्र आणि राज्यांप्रमाणेच जिल्हा परिषदा, महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महिलांच्या गरजांवर आधारित आर्थिक नियोजन आवश्यक आहे. महिलांसाठीचा निधी, त्याचा खर्च आणि प्रत्यक्ष परिणाम यांचा नियमित मागोवा घेतला पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राज्यांतील महिला लोकप्रतिनिधींनी सादरीकरणाची प्रत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. राज्य आणि स्थानिक पातळीवर ‘महिला बजेट गट’ स्थापन करून विविध राज्यांतील चांगल्या उपक्रमांची देवाणघेवाण करावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here