*लोकभवनात जन्माष्टमी निमित्त भजन संध्या; अनुप जलोटांच्या भजनांनी दरबार हॉल मंत्रमुग्ध*
मुंबई – महाराष्ट्र लोकभवनातील दरबार हॉल आज जन्माष्टमी निमित्त भक्तिरसात न्हाऊन निघाला. भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत जलोटा यांनी कृष्ण भजने आणि आपली लोकप्रिय भजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी अभिनेते शेखर सुमन, अंजन श्रीवास्तव, शरद पोंक्षे, गायिका इला अरुण, डॉ. नरेंद्र जाधव, ब्रह्माकुमारी रुक्मिणीबेन, रामकृष्ण मठाचे स्वामी दयाधीपानंद, निवृत्त न्यायमूर्ती के.के. तातेड, मदन गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांनी अनुप जलोटा आणि सहकलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यपालांच्या खासगी सचिव अर्चना गायकवाड यांनी केले.
—
*बॅनर लाईन:*
लोकभवनात अनुप जलोटांची भजन संध्या
राज्यपालांच्या उपस्थितीत जन्माष्टमी उत्सव






















