Home मुंबई *जात पडताळणी समितीच्या कामात कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही !* • महसूल...

*जात पडताळणी समितीच्या कामात कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही !* • महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

7
0

• *नार्को टेस्ट करण्यास माझी पूर्ण संमती*
मुंबई, दि. ६ ऑगस्ट : जात पडताळणी समितीला अर्धन्यायिक अधिकार आहेत; त्यांच्या कामकाजात सरकार किंवा कोणत्याही मंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
“माझी नार्को टेस्ट करण्यास माझी पूर्ण संमती आहे,” असे सांगून ते म्हणाले, “जात पडताळणी समितीचा निर्णय अंतिम निर्णय नसतो. आपल्यावर अन्याय झाला असे वाटले तर, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.”

महसूल मंत्री बावनकुळे मुंबई येथे माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले, “ मनोज जरांगे पाटीलांच्या आरोपांना मी प्रत्युत्तर देणार नाही. मी वस्तुस्थिती सांगेन. तीच सांगतो आहे. मी महसूल मंत्री असलो तरी जात पडताळणी समितीला फोन करून निर्णय बदलण्यास सांगू शकत नाही. समितीचे स्वतंत्र अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्यामुळे कोणत्याही मंत्र्याच्या सांगण्यावरून जात प्रमाणपत्रे रद्द झाली, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही. कोणाची प्रमाणपत्रे रद्द झाली; तो डेटा मिळतो. “

जात पडताळणी समितीच्या निर्णयांबाबत शंका असल्यास न्यायालयीन मार्ग उपलब्ध असून, संबंधितांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here