Home मुंबई *स्व. निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सामना’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन*

*स्व. निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सामना’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन*

26
0

*महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम*

मुंबई: १४ जुलै: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’तर्फे सामना’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन शनिवार, १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला १९४७ मध्ये प्रदर्शित झालेला, जब्बार पटेल दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर लिखित सामना हा चित्रपट येत्या मराठी चित्रपट विश्वातील महत्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्यासह या चित्रपटात मोहन आगाशे, श्रीराम लागू आणि स्मिता पाटील अशा मान्यवर कलाकारांनीही आपली व्यक्तिरेखा साकारली होती.

‘चित्रपट रसास्वाद मंडळा’चे सदस्य तसेच मराठी चित्रपटप्रेमींनी या विशेष प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ने केले आहे.
………,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here