सोलापूर दि.९/६/२०२६ *सोलापूर* *शहरातील झोपडपट्ट्या व कामगार वसाहतीतील विषारी हातभट्टी दारू व विषारी ताडी विकणारे हड्डे बंद करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी(महाराज)यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले*
*मा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात आपल्या सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील दारू उत्पादन करणाऱ्या हातभट्टी हड्यावर धडक कारवाई करून हड्डे उध्वस्त केले आणि संबंधांवर कारवाई केले सोलापूर शहरात सुमारे 177 झोपडपट्टी आहेत त्याचबरोबर अनेक कामगार वस्ती आहेत त्या ठिकाणी राजरोषपणे विषारी हातभट्टी धारू व विषारी ताडी विकले जाते ही विक्री 24 तास रात्रंदिवस चालू असते हे विषारी दारू व ताडी पिऊन अनेक गरीब कामगारांचे निधन झाले आहे. परंतु गरीबीमुळे निधन पावलेल्या कुटुंबीयांनी कुठेही तक्रार करत नाही त्याचा फायदा घेऊन हातभट्टी दारू व ताडीवाले राजरोसपणे आपला धंदा करीत आहेत विषारी हातभट्टी दारूवाले भल्या पहाटे दारूची पुरवठा करतात तर घरगुती ताडीवाले स्वतःच्या घरातच विषारी ताडी तयार करून विकतात आणि ती विषारी दारू व ताडी पिऊन निधन पावल्याने त्यांचे कुटुंबीय निराधार व निसाह्य झाले व होत आहेत या गरीब कामगारांचे जीव वाचवण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी घरगुती ताडी व दारू हड्डे बंद होणे गरजेचे आहे तरी माननीय यांनी ज्याप्रमाणे विषारी दारू व ताडी हड्डे उध्वस्त केलात त्याचप्रमाणे शहरातील गरीब वसत्या व झोपडपट्टीतील विषारी दारू व ताडी विक्री हड्डे बंद करून गोरगरीब कामगारांचे जीव वाचवाचे ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले आहे*
*विष्णु कारामपुरी(महाराज)यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्य मंडळात रेखा आडकी,विठ्ठल कुराडकर,लक्ष्मीबाई ईप्पा, श्रीनिवास बोगा,गुरुनाथ कोळी,सुवर्णा चनमल,भारत देवकुळे,सुरैय्या मनियार, पप्पू शेख,लक्ष्मी कोंडले, लक्ष्मीबाई कोनापुरे, यांचा समावेश होता*
————————————————**फोटोमॅटर*:-*सोलापूर शहरातील* *विषारी हातभट्टी दारू व विषारी ताडी विकणाऱ्या हड्डे बंद करा अशा मागणीचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क उपाध्यक्ष श्री सौरभ अदाते साहेब यांना देताना विष्णू कारामपुरी (महाराज)व कामगार सेनेचे पदाधिकारी दिसत आहेत*
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *विषारी दारु व विषारी ताडी हड्डे बंद करा* *कामगार सेनेचे राज्य उत्पादन...















