Home मुंबई *बेस्ट बस अपघातातील जखमी ऋषभ गुप्ता यांच्या प्रकृतीची महापौर रितू तावडे, बेस्ट...

*बेस्ट बस अपघातातील जखमी ऋषभ गुप्ता यांच्या प्रकृतीची महापौर रितू तावडे, बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी शीव रुग्णालयात जाऊन केली विचारपूस*

13
0

*बेस्ट बस अपघातातील जखमी ऋषभ गुप्ता यांच्या प्रकृतीची महापौर रितू तावडे, बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी शीव रुग्णालयात जाऊन केली विचारपूस*

*गुप्ता कुटुंबीयांना तात्काळ दोन लाख रुपयांची मदत करण्याचे कंत्राटदाराला दिले निर्देश*
ऋषभ गुप्ता यांना सर्व वैद्यकीय उपचार प्रशासनाच्या वतीने पुरवण्याचे रुग्णालय प्रशासनाला दिले निर्देश*

दादर मध्ये प्लाझा चित्रपटगृह जवळ आज झालेल्या बेस्ट बस अपघातातील ऋषभ गुप्ता (वय २२) हा युवक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (शीव) येथे अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे, बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी रुग्णालयात भेट देऊन ऋषभ गुप्ता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ऋषभ यांच्या आई रामा गुप्ता, इतर नातेवाईक अंकित गुप्ता, श्रद्धा शर्मा यांची देखील भेट घेऊन त्यांना तावडे आणि विश्वासराव यांनी धीर दिला. तसेच ऋषभ यांच्या वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च प्रशासनाच्या वतीने केला जाईल, त्याच्या उपचारात सर्वतोपरी दक्षता घेण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला केली आहे, असे त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

त्याचप्रमाणे, संबंधित बेस्ट बस कंत्राटदाराला तेथूनच थेट दूरध्वनी करून गुप्ता कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची तात्काळ मदत करण्याची सूचना महापौर रितू तावडे, बेस्ट समितीच्या अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव यांनी केली. त्याचप्रमाणे या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या वतीने देखील नातेवाईकांना मदत प्रदान केली.

महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे हे यावेळी उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here