Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *अखंड नाम जप लिखित यज्ञ अभियानात दोनशे स्वामी भक्तांचा सहभाग*

*अखंड नाम जप लिखित यज्ञ अभियानात दोनशे स्वामी भक्तांचा सहभाग*

29
0

सोलापूर
श्री स्वामी समर्थ अखंड नामजप लिखित यज्ञ अभियानात जुळे सोलापूर येथील दोनशे स्वामीभक्त बंधू-भगिनी आपले नाव नोंदवून सहभाग घेतला
अखंड नाम जप लिखित यज्ञ समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थ लिखित नाम जप पुस्तकाचे वितरण सोहळा दिनांक १४ मे गुरुवार रोजी सायंकाळी जुळे सोलापूर रेल्वे ब्रिज जवळील श्री दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आले
प्रारंभी श्री दत्त महाराजांची आरती मंदिराचे पुजारी श्री चिदानंद स्वामी,विष्णु कारमपुरी (महाराज),सचिन चौधरी सर,प्रसाद जगताप. यांच्या हस्ते व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर अखंड लिखित नाम जप पुस्तकांची माहिती समितीचे प्रमुख विष्णू कारमपुरी(महाराज) यांनी दिली त्यानंतर सर्व भाविक भक्तांना लिखित वह्यांचे वाटप करण्यात आले
सदर श्री स्वामी समर्थ शतकोटी यज्ञात सुमारे दोनशे स्वामीभक्त बंधू- भगिनींनी सहभाग नोंदविला शतकोटी लिखित वह्या वाटप विष्णू कारमपूरी (महाराज),सचिन चौधरी सर,प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी,प्रा.श्रीशैल वाघमोडे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
———————————-
फोटोमॅटर: श्री स्वामी समर्थ शतकोटी लिखित नामजप समितीच्या वतीने पुस्तक वितरण सोहळा प्रसंगी विष्णू कारमपुरी(महाराज) सचिन चौधरी ,प्रसाद जगताप,गुरुनाथ कोळी,श्रीशैल वाघमोडे सर,यांच्यासह भाविक भक्तगण दिसत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here