Home मुंबई *महिलांच्या पुण्यातील सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधा सुधारण्यावर भर, लवकरच उच्चस्तरीय बैठक घेणार...

*महिलांच्या पुण्यातील सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधा सुधारण्यावर भर, लवकरच उच्चस्तरीय बैठक घेणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

10
0

मुंबई. दि.२४: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा तसेच वेग व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांबाबत परिसर संरक्षण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ आणि श्वेता वेरणेकर यांनी विधानपरिषद उपसभापतींच्या दालनात उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचेसमोर सविस्तर सादरीकरण केले .

सादरीकरणानंतर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी पुण्यातील निरीक्षणांच्या आधारे सार्वजनिक वाहतुकीत महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. विशेषतः गर्भवती महिलांना बसमध्ये चढताना अडचणी येतात, याकडे लक्ष वेधत त्यांनी बसच्या पायऱ्या सध्याच्या तुलनेत अधिक खाली असाव्यात, अशी सूचना केली. सध्याच्या बसच्या उंच पायऱ्यांमुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात परिवहन मंत्र्यांसोबत प्राथमिक बैठक झाल्याची माहिती देत, लवकरच बेस्ट तसेच राज्यात बस परिवहन संस्थांसोबत, तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मे महिन्यात ही बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न असून, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतले जातील.”असेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पायाभूत सुविधांमध्ये बदल, जागरूकता आणि धोरणात्मक नियोजन आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here