Home मुंबई बोरिवलीत ‘तिसरे अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन’ हाउसफुल्ल !

बोरिवलीत ‘तिसरे अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन’ हाउसफुल्ल !

16
0

आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’ २० आणि २१ एप्रिल २०२६ रोजी बोरीवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु नाट्यगृह) येथे प्रेक्षकांच्या हाउसफुल गर्दीत संपन्न झाले.

या दोन दिवसीय संमेलनात
रसिकांसाठी विनामूल्य ‘मृत्युंजय महात्म्य’ (२० एप्रिल)आणि ‘गोकुळचा चोर’ (२१ एप्रिल) हे दशावतारी नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सादर झाले .

ज्येष्ठ दशावतारी रंगकर्मी यशवंत तेंडुलकर हे सदर नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे अध्यक्ष होते तर प्रा. डाॅ.गणेश चंदनशिवे तर वास्को,गोव्याचे राजेंद्र केरकर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रमुुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप कबरे यांनी मनोगत व्यक्त करताना बोरिवलीमध्ये प्रथमच अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनाचे आयोजन होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला, तसेच खणखणीत मालवणी गाऱ्हाणे घालून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली.
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रा. डॉ.गणेश चंदनशिवे यांनी दशावतारी लोककलेचे महत्व सांगून दशावतार या सदर ग्रंथाचे लोककला अकादमीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल असे घोषित केले.
ज्येष्ठ दशावतारी रंगकर्मी यशवंत तेंडुलकर यांनी आपल्या खुमासदार अध्यक्षीय भाषणात दशावताराची सुरुवात दशावताराचे लोककलेतील महत्त्व आणि योगदान याचं वर्णन केलं.
निमंत्रक डॉ अशोक भाईडकर यांच्या दशावतार या महाग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच द ग्रेट इंडियन फोक ड्रामा दशावतार या इंग्रजी आवृत्तीचे विमोचन केले.
सदर नाट्यसंमेलनाला संभाजी सावंत,मा.अरुण होर्णेकर, प्रभाकर (गोटया सावंत), अशोक मुळे,संदीप कबरे,आनंद साटम, नेत्रा मालाडकर, रामेश्वरी डिचोलकर, संजय देशपांडे, प्रमोद शेलार, संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी, डॉ.अमेय देसाई, विनय जोशी आदी रंगकर्मी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अशोक भाईडकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि पुढील वर्षी गोव्यातील नियोजित ४थ्या अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here