Home Uncategorized भारतीय राज्यघटनेतील १० व्या परिशिष्टाचे पुनर्विलोकन करण्याच्या अनुषंगाने गठित समितीची दुसरी बैठक...

भारतीय राज्यघटनेतील १० व्या परिशिष्टाचे पुनर्विलोकन करण्याच्या अनुषंगाने गठित समितीची दुसरी बैठक पुरी येथे

9
0

● विधानसभेचे मा. अध्यक्ष ॲङ श्री.राहुल नार्वेकर आणि समितीचा ज्येष्ठ विधिज्ञ
ॲङ श्रीहरी अणे यांच्याशी कायदेशीर तरतुदींबाबत उहापोह

पुरी, ओरिसा
भारतीय राज्यघटनेतील १० व्या परिशिष्टाचे पुनर्विलोकन करण्याच्या अनुषंगाने मा. अध्यक्ष, लोकसभा यांनी देशातील राज्य विधानमंडळांच्या पीठासीन अधिकारी यांची समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ॲङ राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ व १० फेब्रुवारी, २०२६ रोजी विधान भवन, मुंबई येथे यासंदर्भातील पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या समितीची दुसरी बैठक मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी पुरी, ओरिसा येथे आयोजित करण्यात आली. आजच्या बैठकीत या विषयावर विचारमंथन झाले तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲङ श्रीहरी अणे यांच्याशी देखील समितीने कायदेशीर तरतुदींबाबत उहापोह केला. आजच्या बैठकीस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर, ओरिसा विधानसभेच्या मा. अध्यक्षा सुरमा पाधी, कर्नाटक विधानसभेचे माननीय अध्यक्ष खादर फरीद व नागालँड विधानसभेचे मा. अध्यक्ष शरिंगेन लॉन्गकुमार उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here