Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट...

*कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली*

7
0

कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांनी गुरुवार दि. १६ एप्रिल रोजी बृहन्मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात झालेल्या या भेटीदरम्यान महापौर रितू तावडे यांनी निकम यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना सन्मानित केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे याप्रसंगी उपस्थित होते. तावडे आणि निकम यांच्यात विविध नागरी विषयांवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा झाली.
रूपाराणी निकम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक वास्तूचा वारसा (हेरिटेज वॉक) अनुभव घेतला. त्यांनी महानगरपालिका सभागृहासह मुख्यालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. विशेषतः आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिलेल्या भेटीत त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेची यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत राहते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रणालीचे कौतुक व्यक्त केले. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख रश्मी लोखंडे यांनी निकम यांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाबद्दल माहिती दिली.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here