*सोलापूर:* महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित वरिष्ठ गट महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व ‘महिला महाराष्ट्र केसरी’ किताब लढतीसाठी पंच, पदाधिकारी व स्पर्धा निरीक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धा सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे २८ ते २९ मार्च २०२६ दरम्यान पार पडणार आहेत.
या स्पर्धेसाठी पदाधिकारी व निरीक्षक म्हणून बापूसाहेब लोंढे (सातारा), अस्लम काझी (सोलापूर), सईद चाऊस (बीड), बाळासाहेब पडघन (धाराशिव), अमर दुधाळ (सोलापूर) आणि शरद कचरे (छ. संभाजीनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच तांत्रिक अधिकारी (पंच) म्हणून माऊली सातव, संभाजी निकाळजे, नितीश काबलिये, रोहिदास आमले, विक्रम पवळे, निलेश मारणे, पप्पू कालेकर, विवेक नायकल, हेमलता घोडके, भाग्यश्री भोईर, शैला धुमाळ, उज्ज्वला साळुंखे, श्रद्धा कचरे, अश्विनी बो-हाडे, कौशल्या वाघ, धारणी येळणे, साईनाथ भोंडवे, बाबा शिरगावकर, भैरवनाथ आरकिले, प्रशांत बाबर, मेघराज सरसंबे, चंद्रकांत मोहोळ, वैभव तेली आणि अमित म्हस्के यांचा समावेश आहे.
स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा. दिनेश गुंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पंचांनी २८ मार्च रोजी सकाळी स्पर्धा स्थळी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. या स्पर्धेमुळे महिला कुस्तीला नवे व्यासपीठ मिळणार असून, राज्यातील मल्लांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार आहे.
या भव्य स्पर्धेचे सह प्रायोजक हरितऊर्जा निर्मिती मधील अग्रेसर कंपनी *सेरेंटिका रिन्यूएबल्स *असून ह्याचे आयोजन निरझरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळ्रळीमोरे साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा.”असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





















