Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर जात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर जात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन*

56
0

सातारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खा.नितीन पाटील, माजी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here