Home Uncategorized *रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न करणाऱ्यांवर शासन कारवाई करणार का? – आ. प्रवीण...

*रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न करणाऱ्यांवर शासन कारवाई करणार का? – आ. प्रवीण दरेकर*

86
0

नागपूर –
रविवारी विधानपरिषदेत राज्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत रुग्णवाहिका वेळेवर न पोचल्यामुळे महिलांचा मृत्यू झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी ” रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न करणाऱ्यांवर शासन कारवाई करणार का?.”असा प्रश्न केला.

प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभागी होत दरेकर म्हणाले की,” रुग्णवाहीका वेळेवर उपलब्ध न होण्याच्या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार का? बाधित कुटुंबांना सरकारने नुकसान भरपाई दिली का? आणि प्रत्येक ठिकाणी डॉक्टर्स असोसिएशन आहेत त्यांना १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. त्यांना ही सेवा प्राधान्याने उपलब्ध होण्यासाठी भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला.

दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “१०८ रुग्णवाहिकेची सेवा आणि जे नियम आहेत त्या नियमात चुकीच्या पद्धतीने रुग्णाला त्रास झाला असेल तर, त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. असे आश्वासन दिले. तसेच याबद्दल एक चौकशी समिती नेमू आणि ज्या एजन्सीना आपण काम देतो त्यांनी योग्य पद्धतीने काम करण्यात दिरंगाई केली तर कारवाई होणे अपेक्षित असल्याचेही, मंत्री आबिटकर म्हणाले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here