*भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांच्यासूचनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती*
नागपूर – महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पुढील वर्षी १०० वर्षे पुर्ण होत आहेत. हा शताब्दी सोहळा शासनाने पार पाडावा.”अशी सूचनावजा विनंती भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी रविवारी सभागृहात केली. दरेकरांच्या सूचनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक उत्तर दिले.
सभागृहात सूचना मांडताना आ. दरेकर म्हणाले की, “पुढील वर्षी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव होत आहे. हा शताब्दी सोहळा शासनाने पार पाडावा. महाबळेश्वर वरुन पोलादपूरमार्गे दापोलीला जोडणाऱ्या रस्त्याची मागणी केलीय. जेणेकरून महाबळेश्वर आणि दापोलीचे पर्यटक एकत्रित होतील. मुंबईत वेगवेगळ्या प्रकारची पोलीस स्टेशनं होताहेत. तशाच प्रकारचे पोलीस स्टेशन अशोकवन येथे व्हावे.”अशी सूचनावजा मागणी दरेकरांनी केली.
दरेकरांच्या सूचनेवर अंतिम आठवडा प्रस्तावावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”चवदार तळ्याच्या शताब्दी सोहळ्याला ५५ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाने मंजूर केले असून दापोली-महाबळेश्वर-सातारामार्गे अक्कलकोट संरेखन आहे त्याची व्यवहार्यता एमएसआरडीसी तपासत असून तेही मार्गी लावू.” असे आश्वस्त केले.
00000


















