ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसला (आयटक) संलग्न विविध कामगार संघटना म.रा.अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, म.रा.आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,संयुक्त खदान मजदूर संघ,ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोशिएशन,ऑल इंडिया जनरल इंश्युरेन्स एम्प्लॉईज असोशिएशन,महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन,ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,बांधकाम कर्मचारी संघटना,ICDS सुपरवाइजर संघटना,महाराष्ट्र राज्य जीवजोती कर्मचारी संघटना,जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन, ऑटो चालक मालक महासंघ, नागपूर जिल्हा शेतमजूर युनियन इत्यादी संघटनांचा संयुक्त हजारो कामगाराचा विराट मोर्चा महाराष्ट्र विधान सभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशन बुधवार १० डिसेंबर २०२५ रोजी ११.३० वाजता चाचा नेहरू गार्डन शुक्रवारी तलाव नागपूर येथून विधानभवनाच्या दिशेने प्रचंड घोषणा देत निघाला.पोलिसांनी मोर्चा शहीद गोवारी चौकामध्ये आडविल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.या मोर्चामध्ये महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
संघठित व असंघठित कामगारांना किमान मासिक वेतन रू.२६,०००/-करा,पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घा, श्रमिक वर्गावर दडपशाही आणून गळचेपी करण्याच्या हेतूने आणलेला जन सुरक्षा कायदा रद्द करा,वीज उद्योगासह सर्व सरकारी उद्योगांचे खाजगीकरण धोरण रद्द करा,वीज उद्योगाच्या खाजगीकरणाचे हेतूने आणलेला सुधारित वीज कायदा -२०२५ महाराष्ट्रात लागू करु नये, स्मार्ट प्रीपेड मीटर वीज ग्राहकांना लावण्यात येऊ नये,चार श्रम संहिता राज्यात लागू न करू नये,विविध उद्योगाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मागण्यांकरीता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे महाराष्ट्रातील व देशातील कामगार नेते कॉम्रेड सुकुमार दामले,मोहन शर्मा,बबली रावत,श्याम काळे,राजू देसले,कृष्णा भोयर,राम बाहेती,प्राध्यापक तानाजी ठोंबरे,दिलीप उटाणे,हर्षालाल रहांडाले, कॉम्रेड जोसेफ,माधुरी क्षिरसागर,उदय चौधरी, दिवाकर नागपुरे,विलास झोडगे,कॉम्रेड शाहीर भगत, कॉम्रेड नयन गायकवाड,मुगाजी बुरुड,कॉम्रेड सी.एम. मोर्य,कॉम्रेड भारती भोयर,कॉम्रेड मंजू वर्मा,कॉम्रेड महेश,जाधव,विजय ठाकरे व भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कॉम्रेड सुभाष लांडे व कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केले. मोर्चाचे निवेदन संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विधान भवना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
Home Uncategorized *नागपूर विधानसभेवर हजारोच्या संख्येने आयटकच्या नेतृत्वात संघटित,असंघटित क्षेत्रातील कामगारांचा विशाल मोर्चा धडकला*



















