Home Uncategorized गोवा बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा आरोपी इसाक मुजावर अटकेत

गोवा बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा आरोपी इसाक मुजावर अटकेत

95
0

10.53 लाखांचा मुद्देमाल जप्त – कोल्हापूर LCB ची मोठी कारवाई

कोल्हापूर, दि. ५ :
राज्यात बंदी असलेली गोवा बनावटीची दारू कुरिअर कंटेनरमधून गुपचूप महाराष्ट्रात आणून विक्रीसाठी नेणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसाक खुदबुद्दीन मुजावर (वय ५१, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गडमुडशिंगी परिसरात सापळा लावून अटक केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या व टाटा कंटेनर गाडी मिळून तब्बल १० लाख ५३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, इसाक मुजावर हा डिलीवरी कुरिअर कंपनीच्या साहित्याच्या आडून स्वतःच्या टाटा कंटेनर (MH14-JL-8818) मधून गोवा बनावटीची विदेशी दारू घेऊन गडमुडशिंगीकडे जात होता. उचगाव-गडमुडशिंगी रोडवर लावलेल्या सापळ्यात त्याला गाडीसह पकडण्यात आले.

तपासादरम्यान कंटेनरच्या केबिनमध्ये सिग्नेचर प्रिमीअर, ब्ल्यू अँड गोल्ड, अमेरिकन प्राईड, रॉयल चॅलेंज, वोल्डमंक आणि इम्पीरियल ब्ल्यू या विदेशी ब्रॅण्डच्या ९३ बाटल्या मिळाल्या. या दारूची किंमत ५३ हजार ४७५ रुपये असून, कंटेनरसह एकूण मुद्देमालाची किंमत १० लाख ५३ हजार ४७५ रुपये इतकी आहे.

आरोपी इसाक मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाड जिल्ह्यांसह गुजरात राज्यात चोरी, अपहरण आणि संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुजरातमध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार सो व अपर पोलीस अधीक्षक बी. धिरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, अमित मर्दाने, संजय पडवळ, रुपेश माने व विनोद कांबळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here