Home Uncategorized उजळाईवाडीच्या शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानने तृतीयपंथीना दिला श्री.च्या आरतीचा बहुमान

उजळाईवाडीच्या शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानने तृतीयपंथीना दिला श्री.च्या आरतीचा बहुमान

108
0

उजळाईवाडी महालक्ष्मी नगर येथील शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानने तृतीयपंथी यांना श्री.च्या आरतीचा बहुमान दिला .या प्रतिष्ठानचे सामाजिक समतेचे कार्य आदर्शवत आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या विभागीय सदस्या श्रीमती मयुरीताई शिवाजीराव आळवेकर अध्यक्षा मैत्री तृतीयपंथी संघटना कोल्हापूर जिल्हा यांनी केले.

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठान(शिवराजे ग्रूप) महालक्ष्मीनगर येथील मंगलमुखी श्री’च्या आरतीचा बहुमान तृतीयपंथी समुदायासोबत साजरा केला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रमुख उपस्थितीत श्रीमती सुहासिनी मयुरीताई आळवेकर ( राज्यातील पहिल्या तृतीयपंथी सहल गाईड)व श्रीमती रिया मयुरीताई आळवेकर( देशातील पहिल्या सरकारी तृतीयपंथी शिक्षिका. जिल्हा परिषद शाळा ओरोस बुद्रुक नं. १) तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या होत्या.प्रास्ताविक प्रा. उमाकांत हत्तीकट यांनी केले. स्वागत रोहित सातपुते यांनी केले.
यावेळी पारंपरिक वेशभूषेत तृतीयपंथीयांनी श्रीं ची आरती केली. युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते म्हणाले की ,तृतियपंथीयांनाही मन, भावना, विचार आहेत, त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळावी ,कोणताही भेदभाव न करता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून विकासाची समान संधी मिळावी म्हणून आम्ही गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते घ्यावी, असा मंडळात प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सभासदांनी संमती दर्शविली.

या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष अमर गावडे,उपाध्यक्ष बंडू लोहार,सचिव राजाराम जाधव,खजनीस भैरू सातपुते,आनंदा शिंगे, नितीन पाटोळे, नारायण माने, विनायक डाफळे,अक्षय जाधव, अक्षय गावडे , अभिमन्यू गावडे, जालिंदर कश्यप, अजित गायकवाड, मिलिंद कांबळे, निखिल सुतार, रत्नदीप सातपुते, विनायक सुतार, यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

चौकट:
विधायक उपक्रमाद्वारे आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात घेण्याचा व आमच्यासारख्या वंचित घटकाला शिवराजे ग्रूपने श्री च्या आरतीचा बहुमान दिल्यामुळे मनस्वी आनंद झाला.
मयुरीताई आळवेकर

चौकट:
तृतीयपंथीयांना आरतीचा मान देऊन एक स्तुत्य पायंडा सुरू केला आहे. त्याचा आदर्श घेऊन विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी अशा दुर्लक्षित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणावे.
श्रीमती रिया आळवेकर
शिक्षिका

चौकट:
अशा विधायक उपक्रमामुळे समाजाने माणूस म्हणून जगण्याची संधी दिली आहे.यामुळे समाजात एकोप्याची भावना निर्माण होईल़.
श्रीमती सुहासिनी आळवेकर

 

फोटो ओळ:
उजळाईवाडी महालक्ष्मी नगर येथील शिवराजे शिवार बहुद्देशीय प्रतिष्ठान वतीने श्री गणेश आरतीचा बहुमान तृतीयपंथी यांना देण्यात आला.
छाया मोहन सातपुते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here