उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अभिनेता टायगर श्रॉफची भेट – मुंबईत गुन्हेगारी टोळीची दादागिरी खपवून घेणार नाही
> *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अभिनेता टायगर श्रॉफची भेट*
>
> मुंबई दि. १९ :- बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यातून तो सुखरूप बचावला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.
>
> या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोणत्याही गँगची दहशत खपवून घेतली जाणार नाही. जो कुणी असे प्रयत्न करेल त्याला पोलीस जशास तसे उत्तर देतील. ९०च्या दशकात मुंबईतील गँगवार संपवला होता, आताही तशीच कारवाई केली जाईल.
>
> मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या असून सर्व कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिष्णोई गँगकडून धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
>
> टायगर श्रॉफ याचे कुटुंबीय सध्या दहशतीखाली असून त्याची आई आयेशा श्रॉफ प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
























