*मानवी मन:स्थितीचा दिव्य आरसा आणि सुखाचा अंतर्वेध!*
*’आणि मला सुख सापडले……हो!’ — रा. ग. सोनुने गुरुजी, बुलढाणा*
*समीक्षक: प्रो. शीतल हरीष करदेकर ( संपादक, Mai Media 24)*
आजचा मनुष्य भौतिक सुखाच्या मागे धावत असताना स्वतःकडे पाहायला विसरला आहे. अशा काळात रा. ग. सोनुने गुरुजींचा लेख वाळवंटातील सुगंधी झुळूक आहे.
*१ साक्षीभाव — लेखाचा आत्मा*
“मी हा विचार व भावना पाहणारा ‘साक्षी’ होतो…” — या एका वाक्यात भारतीय तत्त्वज्ञानातील स्थितप्रज्ञता आली. बाहेर कल्लोळ असताना आत शांत राहणे हेच दिव्य आहे.
*२. वैश्विक विचारांचा सुवर्णसंगम*
विवेकानंद — “काम सुखासाठी करू नका तर सुखी होऊन करा”, विनोबा भावे — “मन हा केंद्रबिंदू आहे”, प्लेटोचा विवेक — या सर्वांच्या आधारे लेख मानसोपचार आणि तत्त्वज्ञानाचा मिलाफ बनला आहे.
*३. स्वतःचे सुख ते सामाजिक सुख*
बेंथेम यांच्या “जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख” या सिद्धांतातून गुरुजी सांगतात — मी सुखी असून चालणार नाही, समाजही सुखी पाहिजे.
*४. सुखाचे ४ सुवर्णनियम*
“आम्ही सुखाचे चिंतन कमी आणि दुःखाचे जास्त करतो” — यावर उपाय —
१ तुलना नसावी
२. अति अपेक्षा नसावी ३. पश्चात्ताप नसावा ४. चिंता नसावी
*निष्कर्ष*
हा लेख अक्षरांचा संग्रह नाही, तर तावून सुलाखून निघालेल्या मनाची गाथा आहे. पैशातून मिळणारे सुख तात्पुरते, मनाच्या सशक्ततेतून मिळणारे शाश्वत असते. लेख वाचून प्रत्येकाला वाटते — “होय, मलाही सुख सापडले!”
*MAI MEDIA 24 ला या लेखाचा सार्थ अभिमान. सोनुने गुरुजीं चे अभिनंदन!*
—























