रत्नागिरीच्या विकासात आणखी एक मानाचा टप्पा!
भाजी मार्केटच्या नूतन इमारतीचे लोकार्पण संपन्न!
रत्नागिरी नगरपरिषदेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या नगरपरिषद हद्दीतील जुन्या भाजी मार्केटच्या ‘श्री नवलाई देवी भाजी मंडईच्या’ नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज माझ्या हस्ते उत्साहात पार पडला.
या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. विरेंद्र कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या इमारतीचे बांधकाम उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये स्टिल्ट फ्लोअर, तळमजला आणि पहिला मजला अशा स्वरूपाचे बांधकाम करण्यात आले असून, आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या या नवीन भाजी मार्केटचा लाभ संबंधित गाळेधारकांसह रत्नागिरीकरांनाही मिळणार आहे. यामुळे विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच नागरिकांनाही खरेदीसाठी स्वच्छ, नीटनेटकी आणि सुविधाजनक जागा मिळेल.
या उत्कृष्ट वास्तूची उभारणी केल्याबद्दल विरेंद्र कन्स्ट्रक्शन यांचे मनःपूर्वक कौतुक करतो. तसेच हा सुंदर आणि नीटनेटका कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल रत्नागिरी नगरपरिषदेतील माझे सर्व सहकारी आणि कर्मचारी यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो.
यावेळी माझ्यासोबत नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख राहुल पाटील, बंड्याशेठ साळवी, शहरप्रमुख विपिन बंदरकर, तालुकाप्रमुख बापू म्हाप, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्थानिक नगरसेवक विजय खेडेकर, नगरसेविका सौ. सायली पाटील, नगरसेवक अभि दुडे, पाणी सभापती निमेश नायर, ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे, तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गारवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
रत्नागिरीच्या विकासाला गती देताना नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, हाच आमचा संकल्प आहे. शहराच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी असेच विकासाभिमुख उपक्रम सातत्याने राबवले जातील!
Shivsena – शिवसेना Devendra Fadnavis Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
#udaysamant #udaysamantsaheb #Ratnagiri #RatnagiriDevelopment #रत्नागिरी #श्रीनवलाईदेवीभाजीमंडई #विकसितरत्नागिरी #जनसेवा #नगरपरिषद
























