Home नागपूर *जातनिहाय जनगणनेसाठी नागपुरात देशव्यापी रणशिंग – ११ ऑक्टोबरला १५० ओबीसी नेत्यांची राष्ट्रीय...

*जातनिहाय जनगणनेसाठी नागपुरात देशव्यापी रणशिंग – ११ ऑक्टोबरला १५० ओबीसी नेत्यांची राष्ट्रीय बैठक*

55
0

*जातनिहाय जनगणनेसाठी नागपुरात देशव्यापी रणशिंग – ११ ऑक्टोबरला १५० ओबीसी नेत्यांची राष्ट्रीय बैठक*

*नागपूर, दि. ३:* जातिनिहाय जनगणनेच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरूप देण्यासाठी देशभरातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय बैठक येत्या ११ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित करण्यात आली आहे.

सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

या बैठकीत देशभरातील विविध ओबीसी संघटनांचे सुमारे १५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. जातिनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे विविध प्रश्न आणि आगामी आंदोलनाची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

तामिळनाडू पासून काश्मीरपर्यंतच्या विविध राज्यांतील ओबीसी संघटनांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

जनगणनेत ओबीसींचा वेगळा कॉलम असावा, लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य हक्क मिळावा, या मागण्यांवर बैठकीत विचारविनिमय होईल. विशेषतः नोव्हेंबर महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाची अंतिम रूपरेषा या बैठकीत निश्चित केली जाणार आहे.

देशभरातील ओबीसी संघटनांना एका समान व्यासपीठावर आणून जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी एकजूट निर्माण करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

*-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here