Home नागपूर *महावितरणची ६३६ कोटींची ई-व्हेईकल निविदा वादात; ३० वर्ष सेवा देणाऱ्या स्थानिक चालक-मालकांचा...

*महावितरणची ६३६ कोटींची ई-व्हेईकल निविदा वादात; ३० वर्ष सेवा देणाऱ्या स्थानिक चालक-मालकांचा रोजगार धोक्यात*

37
0

*महावितरणची ६३६ कोटींची ई-व्हेईकल निविदा वादात; ३० वर्ष सेवा देणाऱ्या स्थानिक चालक-मालकांचा रोजगार धोक्यात*

*सब-हेड:*
भाडेदरात दुप्पट तफावत – महावितरणचा ५७,२०० रु. तर स्थानिकांचा २९,९०० रु.; नवचेतना संघटनेचा आक्षेप

*बातमी:*

*नागपूर:* महावितरणने राज्यभरासाठी १,११३ इलेक्ट्रिक वाहने चालकासह भाड्याने घेण्यासाठी काढलेली ६३६ कोटी ४६ लाखांची निविदा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या निविदेमुळे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून महावितरणला सेवा देणाऱ्या हजारो स्थानिक वाहन चालक-मालकांच्या रोजगारावर गदा येणार आहे, असा आरोप होत आहे.

*निविदेत काय आहे?*
महावितरणला ४० मध्यम मोटारी, ११९ लहान बहुउपयोगी मोटारी, ४६९ मोटारी, २०० ई-व्हॅन आणि २८५ मालवाहू अशी एकूण १,११३ वाहने हवी आहेत. हा करार तब्बल १० वर्षांसाठी असून पहिल्या ५ वर्षांचा दर फिक्स, पुढच्या ५ वर्षात ४०% सवलत देण्याची अट आहे.

*स्थानिकांचा आक्षेप काय?*
निविदेच्या अटीनुसार – कंत्राटदाराला करार झाल्यानंतर *नवीनच वाहने खरेदी करावी लागतील*, जुन्या-स्थानिक वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या स्थानिकांना डावलले जात आहे.

नवचेतना टॅक्सी चालक-मालक संघटनेचे सचिव *योगेश गोमासे* म्हणाले, “आमचा ई-व्हेईकलला विरोध नाही, पण आमच्या अनुभवाचा विचार करून आम्हाला संधी द्यावी. आमचा रोजगार हिरावला जाऊ नये.”

*दरातील मोठी तफावत -*
निविदेत ४६९ मोटारींसाठी महावितरणने महिन्याला *५७,२०० रुपये* दराची मर्यादा ठेवली आहे, तर सध्या स्थानिक चालकांना *२९,९०० रुपये* दिले जातात. म्हणजे थेट *२७,३०० रुपयांची तफावत* – हा पैसा कोणाच्या खिशात जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

*महावितरण काय म्हणतं?*
याबाबत स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बैठकीनंतर बोलतो सांगून प्रतिसाद दिला नाही. तर मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार म्हणाले, “कोणावरही अन्याय होत नाही, प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे.”

मात्र स्थानिकांची मागणी आहे – दर निश्चितीचे निकष जाहीर करा आणि आमच्यासोबत बैठक घेऊन रोजगार संरक्षणाचा निर्णय घ्या.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here