Home मुंबई *पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ – अमित शाह...

*पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ – अमित शाह यांची घोषणा*

13
0

*पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ – अमित शाह यांची घोषणा*

*मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२६ -* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून २५ वर्षांच्या कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त *१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर* या कालावधीत राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अमित साटम उपस्थित होते.

*अभियानातील १२ प्रमुख कार्यक्रम:*

*१. सेवा दिवस:* रक्तदान, दीपप्रज्वलन, जनआभार
*२. माझ्या स्वप्नातील भारत:* देशव्यापी चित्रकला-भाषण स्पर्धा
*३. अंगण मिलन सेवा:* अंगणवाडी सेविका, आशा दीदींचा सन्मान
*४. सेवा कथा:* लाभार्थ्यांच्या यशोगाथा
*५. सेवा ज्योती कलश यात्रा:* विकसित भारत संकल्प यात्रा
*६. वडनगर-वाराणसी सेवा यात्रा:* पवित्र नद्यांच्या जलाने जलाभिषेक – प्रत्येकी १० गटांमार्फत यात्रा
*७. सेवेतील माझे योगदान:* २५ सेवा उपक्रम
*८. सेवा सेतू अभियान:* ब्लॉक स्तरावर शिबिरे
*९. सेवेचे रंग, राष्ट्रासंगे:* सार्वजनिक ठिकाणी योजना प्रदर्शन
*१०. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज:* ५ प्रादेशिक स्पर्धा
*११. सुशासन संवाद:* १७ ऑक्टोबर रोजी ४ ठिकाणी

अमित शाह म्हणाले, “२०१४ पूर्वी राजकारण भ्रष्टाचार, जातिवाद, परिवारवादाने ग्रस्त होते. मोदीजींनी ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’ आणले. फ्रॅजाइल फाईव्ह मधून टॉप फाईव्ह अर्थव्यवस्था बनलो. *७.८% GDP* वाढ, कलम *३७०*, नक्षलवाद, ईशान्य भारत प्रश्न सोडवले. *२५ कोटी* लोक गरिबी रेषेच्या वर आले.”

*मोदी सरकारच्या योजना:*
– *४४ कोटी* लोकांना *५ लाखांपर्यंत* मोफत उपचार
– *१६ कोटी* घरांमध्ये नळाद्वारे पाणी
– *१३ कोटी* घरांमध्ये शौचालये
– *११ कोटी* घरांमध्ये उज्ज्वला गॅस
– *४ कोटी* गरिबांना घरे
– *७ कोटी* घरांमध्ये वीज
– *३ कोटींपेक्षा जास्त* महिलांना लखपती दीदी

*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA २४*

#MAIMEDIA२४ #SevaSankalpAbhiyan #NarendraModi #AmitShah #ProShittalKardekar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here