सण उत्सव
*राज्यपालांकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे वितरण*
*मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२६ -* गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे वितरण करण्यात आले.
यावेळी राज्यपाल म्हणाले, “भारतीय संस्कृतीचा निसर्ग आणि पर्यावरणाशी नेहमीच अतूट संबंध राहिला आहे. मात्र अलीकडच्या काळात हा संबंध कमी होत आहे. युवा पिढी पुन्हा शाश्वत सांस्कृतिक मूल्यांकडे वळत आहे ही समाधानाची बाब आहे.”
*पुढील वर्षी शाळांमध्ये वितरण:*
पुढील वर्षी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे वितरण करण्याचा मानस असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची जागरूकता निर्माण होईल.
राज्यपालांनी स्वयंसेवी संस्थांना ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’, ‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्लास्टिकच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम आणि पर्यावरण ऱ्हासाचा सर्वाधिक फटका गरीब, कामगार आणि वंचित घटकांना बसतो. पर्यावरण संरक्षण ही केवळ पर्यावरणीय नाही तर सामाजिक जबाबदारीही आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
*उपस्थित मान्यवर:* प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राहुल रेखावार, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, नवशक्तीचे प्रकाश सावंत, माजी कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, अभिनेत्री रशा टंडन, हिना खान, अभिनेते आशुतोष पत्की यांच्यासह विविध मंडळांचे प्रतिनिधी.
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA २४*
#MAIMEDIA२४ #EcoFriendlyGanesh #Governor #JishnuDevVarma #LokBhavan #GaneshChaturthi #ProShittalKardekar
—
*




















