मुंबई दि. २९ जून – नंदूरबार जिल्हयातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यामध्ये नंदुरबार नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती निंबा मोहन माळी, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा बुधा पाटील, मधुर निंबा माळी, जगदीश अशोक निकम, वंचितचे युवा जिल्हाअध्यक्ष दिनेश बिऱ्हाडे, विश्वजित भामरे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार सना मलिक-शेख, नंदूरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.














