Home Trending Now तामिळनाडूत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाची लाट! द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के....

तामिळनाडूत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाची लाट! द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत!

14
0

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालातील सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांचा पराभव
तामिळनाडूसह पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरु आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला आहे. द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पराभव झाला आहे. अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाच्या त्सुनामीमध्ये द्रमुकचा मोठा पराभव झाला आहे.

तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या तमिलगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाची लाट विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निकालात सत्ताधारी द्रमुकचा मोठा पराभव झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पराभव झाला आहे. टीव्हीकेच्या व्ही.एस.बाबू यांनी त्यांचा पराभव केला आहे. या विधानसभा मतदारसंघात अण्णा द्रमुकचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहे.

तामिळनाडूमध्ये आकडेवारीनुसार टीव्हीके पक्ष १०७ जागांवर आघाडीवर तर, द्रमुक ७२ आणि अण्णाद्रमुक ५५जागांवर आघाडीवर आहे. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या द्रमुकला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता विजय थलपती याच्या टीव्हीकेनं १०७ जागांवर आघाडी घेतली आहे. तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेत्यांनी यशस्वी होण्याचा ट्रेंड पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. द्रमुक नेते मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यापुढं अभिनेता विजयचा टिकाव लागणार का याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, अभिनेता विजयच्या पक्षानं शंभर पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेनं वाटचाल सुरु केली .

तामिळनाडूत सर्व पक्ष बहुमतापासून दूर
तामिळनाडूच्या विधानसभेची सदस्यसंख्या २३४ इतकी आहे. या नुसार बहुमताची आकडेवारी ११८इतकी होते. जो पक्ष ११८ जागा जिंकेल तामिळनाडूत सत्ता स्थापन करता येऊ शकते. अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ते बहुमताच्या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. मात्र, सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीके पक्षाला तामिळनाडूत सत्ता स्थापन करता येऊ शकते.

दरम्यान, अभिनेता विजय याचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं समोर येताच मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. अभिनेता विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसनं टीव्हीकेसोबत आघाडी करावी, यासाठी ऑफर दिली आहे. मात्र, राष्ट्रीय राजकारणातील द्रमुक सोबतची आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here