Home Trending Now *मुंबईचा जीव घुसमटतोय! दादर जगातील ३ऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर! गुन्हेगारांंवर न्यायालयाने स्युमोटोने...

*मुंबईचा जीव घुसमटतोय! दादर जगातील ३ऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर! गुन्हेगारांंवर न्यायालयाने स्युमोटोने कारवाई करावी!*

58
0

*MAI MEDIA 24 – EXCLUSIVE*

*मुंबईचा जीव घुसमटतोय! दादर जगातील ३ऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर! न्यायालयाने स्युमोटोने कारवाई करावी!*

*मुंबई – MAI MEDIA 24 स्पेशल | प्रो. शीतल हरीश करदेकर*

मुंबईचा जीव घुसमटतोय! दादर आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. *AQI २०३ पार! मुंबईचा एकूण AQI १७६!* ही केवळ आकडेवारी नाही, तर मुंबईकरांच्या फुफ्फुसांवरचा हल्ला आहे.

*MAI MEDIA 24 ने शोधले – मुंबईच्या मृत्यूची ४ कारणे आणि ४ गुन्हेगार!*

*१) प्रत्येक भागातलं प्रदूषण वेगळं, पण मारणारं एकच – झाड तोड, टॉवर बांध!*
– *दादर – माहीम – वरळी:* AQI २०३! समुद्राचा वारा अडवला, उंच टॉवरनी हवा बंद केली.
– *अंधेरी – जोगेश्वरी – कांदिवली:* धूळ आणि सिमेंट! गिल्बर्ट हिलचं खाणकाम, SRA प्रोजेक्ट, मेट्रो – सतत धूळ.
– *भांडुप – विक्रोळी – मुलुंड:* केमिकल आणि कचरा! १८४ झाडं तोडून पंपिंग स्टेशन, धूळ वाढणार.
– *गिरगाव – ग्रँट रोड:* जुनी झाडं तोडून नवे टॉवर, हवा खेळती नाही.

*२) मुंबईत पाणी का साचतं? कारण मनपाने नाले विकले!*
झाडाचं मूळ पाणी जमिनीत ओढतं. ४५७ झाडं एका बैठकीत तोडली तर पाणी जाणार कुठे? बिल्डरने भराव टाकून नाले बुजवले, मनपा फक्त बघत बसली. जमीनच उरली नाही पाणी जिरायला.

*३) झाडं मुळापासून का कोसळतात? कारण मनपानेच खून केला!*
फुटपाथ बनवताना, केबल टाकताना मुळं कापली. बुंध्याभोवती सिमेंट ओतलं, झाडाला श्वासच घेता येत नाही. २०० झाडं तोडायची परवानगी देतात, पण पडायला आलेली झाडं वेळेत कापत नाहीत.

*४) धूर आणि धुरळा हवेत का वाढलाय?*
बिल्डरला फक्त घाबरवायचा दंड! धूळ उडाली म्हणून १० हजार दंडाची नोटीस, पण साईटवर पाणी मारण्याची यंत्रणा नाही. झाडं धूळ पकडतात, झाडच नाही तर धूळ हवेतच राहणार.

> *थोडक्यात – पाणी साचतंय कारण झाड तोडलं, झाड कोसळतंय कारण मूळ कापलं, धुरळा वाढलाय कारण बिल्डरला फक्त दंडाचा दिखावा!*

*कोण आहेत गुन्हेगार? MAI MEDIA 24 चा पंचनामा*

*गुन्हेगार नंबर १ – समुद्राचा वारा अडवणारे बिल्डर:* दादर, माहीम, ग्रँट रोडला सी-फेसच्या नावाने उंच टॉवर बांधून वारे अडवले.

*गुन्हेगार नंबर २ – झाडं तोडायचा ठराव मंजूर करणारी मनपा:* बृहन्मुंबई मनपाच्या वृक्ष प्राधिकरणाने ६ ऑक्टोबरच्या बैठकीत ४५७ झाडे तोडायला परवानगी दिली. २५३ तोडायची, २०४ हलवायची. भांडुपमध्ये १८४, परळ KEM मध्ये २८.

*गुन्हेगार नंबर ३ – फक्त दंडाचा दिखावा करणारी यंत्रणा:* बिल्डरने धूळ उडवली, माती खाल्ली – फक्त १० हजार दंड! नोटीस देऊन घाबरवायचं, टॉवर तसाच उभा.

*गुन्हेगार नंबर ४ – गिल्बर्ट हिल विकणारे – पुराव्यासह!*
*१९३९ साली सरकारनेच खाजगी बिल्डरांना विकला होता!* Hindustan Times च्या ‘Once Upon a Hill’ पुस्तकात नमूद – “sold by the government to private builders in 1939, quarried persistently for road-building material”

– १९५३ पासून खाणकाम सुरू
– २००७ मध्ये कसाबसा Grade II हेरिटेज घोषित
– आता Cordcone Builders Pvt Ltd ने परवानगी नसताना थेट टेकडी खोदली – Collector ने Stop Work नोटीस दिली!
– म्हणजे सरकारने विकला, बिल्डरांनी ७० वर्ष फोडला, आता मनपा ५.५ कोटींच्या स्टीलच्या जाळ्या लावतेय!

*६.६ कोटी वर्ष जुना जागतिक वारसा! जगात फक्त ३ ठिकाणी आहे! पण मनपाने Grade I नाही, फक्त Grade II दिला!*

*MAI MEDIA 24 ची मागणी:*
*मुंबईचे मारेकरी गजाआड करा! उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने स्युमोटोने – स्वतःहून – कारवाई करावी!*

*- प्रो. शीतल हरीश करदेकर – माझी जबाबदारी*
*MAI MEDIA 24, मुंबई – स्पेशल*

—
*✍️ संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | https://maimedia24.com | Follow @maimedia24*
*🔵 Facebook | 📸 Instagram | ▶️ YouTube | 𝕏 Twitter | 💬 WhatsApp*

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here