Home मुंबई २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंघ निहाय परिशिष्ट ४४ च्या प्रती लवकरात लवकर...

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंघ निहाय परिशिष्ट ४४ च्या प्रती लवकरात लवकर उपलब्ध करून द्या

17
0

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन केली मागणी.

मुंबई
“महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदानावर सर्वच स्तरातून आजही शंका व संशय उपस्थित करण्यात येत आहे. लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी २८८ मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या मतदार संघ निहाय परिशिष्ट ४४ च्या प्रती लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात.” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे.

ॲड. कोंडविलकर यांनी शुक्रवारी मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील पत्र दिले. पत्रात पुढे असे म्हटले आहे की, “विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस पक्षासह इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मतदानाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केलेल्या आहेत. अनेकांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात विविध तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत व्होटचोरीचा नविन पॅटर्न राबविण्यात आला अशी जनभावना आहे त्यामुळे आयोगाने हे परिशिष्ट उपलब्ध करून द्यावेत.” असे ॲड. कोंडविलकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here